Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाजीराव मस्तानी'नंतर भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' नाही 'तर' या सिनेमात दिसणार प्रियंका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:08 IST

प्रियंका चोप्राने काही दिवसांपूर्वीच 'द स्काय इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर प्रियंकाने बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा साईन केल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते.

ठळक मुद्देगेल्या दोन वर्षांपासून प्रियंका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी होती'द स्काय इज पिंक'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय

प्रियंका चोप्राने काही दिवसांपूर्वीच 'द स्काय इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर प्रियंकाने बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा साईन केल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका संजय लीला भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र यात सलमानच्या अपोझिट आलिया भटच्या नावाची घोषणा झाली, त्यामुळे प्रियंकाचे फॅन्स नाराज झाले. 

  संजय लीला भन्साळी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला की,'' ते प्रियंकासोबत एक सिनेमा बनवण्याचे प्लॉनिंग करतायेत. मात्र तो सिनेमा 'इंशाअल्लाह' नाही.'' पुढे ते म्हणाले, ''मला गंगुबाईची गोष्ट खूप आवडली आहे. मी या सिनेमासंदर्भात प्रियंकाशी बोलणार आहे.'' 

गेल्या दोन वर्षांपासून प्रियंका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी होती. दोन वर्षानंतर ती 'द स्काय इज पिंक'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. 'द स्काय इज पिंक' या सिनेमा प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते.या चित्रपटात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तरप्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासंजय लीला भन्साळीफरहान अख्तर