Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा दिसणार 'क्वांटिको'च्या तिसऱ्या सीझनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:54 IST

प्रियांका चोप्राच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूशखबर आहे. प्रियांका चोप्रा क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनमध्ये ही दिसणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये प्रियांका एलेक्स ...

प्रियांका चोप्राच्या फॅन्ससाठी आणखीन एक खूशखबर आहे. प्रियांका चोप्रा क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनमध्ये ही दिसणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पॅरिशच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सीझन पहिल्या दोन सीझनच्या तुलनेत लहान असणार आहे. केवळ 13 एपिसोडचा असणार आहे. या तिसऱ्या सीझनचा निर्माता जॉश सैफ्रान नसणार आहे. या शोसोबत फक्त एक अभिनेता म्हणून दिसणार आहे. 2015मध्ये सुरु झालेल्या या शोचे अजूनपर्यंत दोन सीझन येऊन गेले आहेत. खराब रेटिंगमुळे हा शो बंद करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा परत या शो ला 13 एपिसोडमध्ये परत आणण्यात आले आहे. पीटीआई दिलेल्या माहितीनुसार गेल्या सीझनची रेटिंग खराब आली होती.  नील्सन रेटिंगच्या आकड्यांनुसार 21 एपिसोडच्या सीझनला 18 ते 49 वयोगटातील लोकांकडून 0.7 रेटिंग मिळाली होती. प्रियांको लोकप्रियतेला बघून हा शो परत आणल्याचे समझते आहे. प्रियांकाने ट्विटरच्या माध्यमातून ही खूशखबर आपल्या फॅन्ससोबत शेअर केली आहे. प्रियांकाने शोला परत आणल्याबद्दल आभार मानले आहेत तसेच एलेक्स पॅरिश लवकरच परत येतेय असे ट्वीट तिने केले आहे. प्रियांका चोप्राला एफबीआय एजेंटच्या याच भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध मिळाली आहे. सध्या ती तिचा आगामी चित्रपट बेवॉचच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी ती 10 दिवसांच्या सुट्टीवर भारतात परतली होती तेव्हा तिने 3 चित्रपट साईन केल्याचे समजते आहे. यातील एक चित्रपट आंतराळवीर कल्पना चावला यांच्या आयुष्यावर आधारित आहे. बाकी 2 दोन चित्रपटांबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही.