Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘क्वांटिको’मध्ये भारताविरोधी डायलॉग बोलणाऱ्या प्रियांका चोप्राला लोकांनी म्हटले, ‘शेम आॅन यू’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 21:40 IST

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये मजल मारणाºया अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या ‘क्वांटिको सिझन-३’ या अमेरिकन टीव्ही मालिकेतील एका डायलॉगमुळे चांगलाच टीकेचा सामना ...

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये मजल मारणाºया अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या ‘क्वांटिको सिझन-३’ या अमेरिकन टीव्ही मालिकेतील एका डायलॉगमुळे चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. प्रियांकाच्या ‘क्वांटिको’च्या तिसºया सिझनचे नाव ‘द ब्लड आॅफ रोमियो’ असे आहे. नुकताच या मालिकेचा एपिसोड प्रसिद्ध झाला. त्यातील एका डायलॉगमध्ये प्रियांका म्हणतेय की, ‘हा पाकिस्तानी नाही. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. एका पाकिस्तानी मुसलमानाच्या गळ्यात ही माळ असूच शकत नाही. हा एक भारतीय राष्टÑवादी आहे, जो पाकिस्तानला फसविण्याचा प्रयत्न करीत आहे.’प्रियांकाच्या या डायलॉगची एक व्हिडीओ क्लिप सध्या इंटरनेटवर वाºयासारखी व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहते प्रियांकावर चांगलीच भडास व्यक्त करीत आहेत. लोकांनी सोशल मीडियावर प्रियांकाला केवळ ट्रोलच केले नाही तर तिच्या विरोधात ‘शेम आॅन यू प्रियांका चोप्रा’ आणि ‘बायकॉट क्वांटिको’ या नावाने हॅशटॅग चालवून एकप्रकारची मोहीमच उघडली आहे. प्रियांकाचा यूजर्सकडून समाचार घेतला जात असताना तिच्यावर अतिशय टोकाची टीकाही केली जात आहे.  दरम्यान, ट्विटरवर प्रियांकाच्या या डायलॉगचा एक व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आले की, ‘क्वांटिकोचा लेटेस्ट एपिसोड रुद्राक्षावरून हिंदूंवर आधारित आहे. ज्यास भारतीय राष्ट्रवादी म्हणून ओळखले जात आहे. ज्याच्याकडे प्रचंड ज्ञान असून, परमाणू हल्ल्याची तयारी करताना पाकिस्तानाला बदनाम केले जात आहे; परंतु ग्रेट प्रियांका चोप्रा आपल्या एफबीआय टीमसोबत त्याला थांबविण्यात यशस्वी होते. ‘#शेमआॅनयूप्रियांकाचोप्रा’ त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची खिल्ली उडविल्यावरूनही लोक प्रियांकाचा विरोध करीत आहे. काही लोकांनी तर असेही म्हटले, ‘जिस थाली में खाती हैं उसी में छेद करती हैं.’ काहींनी तर थाळीला छिद्र असलेले फोटोही शेअर केले.