Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका मिनिटासाठी एक कोटी वसूल करणाऱ्या प्रियंका चोपडाला चाहत्याने केले सहज किस, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 21:10 IST

पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी पाच कोटी रूपयांची डिमांड करणाºया प्रियंका चोपडाला तिच्या एका चाहत्याने किस केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा नुकतीच भारतात परतली आहे. ती तिच्या परिवारासोबत ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनकरिता घरी आहे. नुकतीच प्रियंकाची मुंबई विमानतळावर झलक बघावयास मिळाली. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. प्रियंका विमानतळाबाहेर येत असताना तिच्या चाहत्यांनी तिला अक्षरश: गराडा घातला होता. प्रियंकाची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अनेकांनी तर प्रियंकाची सुरक्षा भेदत थेट तिला गाठले. तिच्यासोबत हस्तांदोलन करतानाच सेल्फीचा आनंदही घेतला. परंतु एक चाहत्याने तिला चक्क किस केले. त्याचे झाले असे की, जेव्हा प्रियंका विमानतळावर चाहत्यांसोबत सेल्फी घेत होती. तेव्हा एक फिमेल फॅन तिच्याकडे आली. ती प्रियंकासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करीत होती. ही बाब जेव्हा प्रियंकाच्या लक्षात आली तेव्हा तिने त्या चाहत्याकडे स्माइल केली. हे बघताच ती चाहती चक्क प्रियंकाच्या गळ्यात पडली अन् तिला किस केले. प्रियंकानेदेखील याचा फारसा विरोध न करता तिला  स्माइल दिली. त्याचबरोबर तिच्यासोबत काही फोटोही काढले. दरम्यान, प्रियंकाच्या या चाहतीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. यूजर्स यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियंका तिच्या एका गोष्टीमुळे चर्चेत आली होती. प्रियंकाने झी सिने अवॉर्ड्समध्ये पाच मिनीट परफॉर्मन्स करण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपयांची मागणी केली. म्हणजेच एका मिनिटासाठी एक कोटी रूपये. प्रियंकाची ही डिमांड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, त्यास या व्हिडीओचा जोड दिला जात आहे. होय, एका चाहत्याने प्रियंकाच्या या व्हिडीओला कॉमेण्ट देताना लिहिले की, ‘एका मिनिटासाठी एक कोटी रूपयांची मागणी करणाºया प्रियंका चोपडला या फिमेल फॅन्सने सहज किस केले.’