Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG!! पुन्हा रंगली प्रियंका चोप्राच्या ड्रेसची चर्चा, जाणून घ्या का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 16:20 IST

अगदी काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ग्रॅमी अवॉर्डमधील ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आताही प्रियंका तिच्या एका ड्रेसमुळे चर्चेत आलीय.

ठळक मुद्देयंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर ती हॉलिवूडचा चित्रपट ‘मॅट्रिक्स’च्या चौथ्या भागात दिसू शकते.

 बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. अगदी काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ग्रॅमी अवॉर्डमधील ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा ड्रेस इतका रिलिव्हिंग होता की, यावरून ती ट्रोल झाली होती. यानंतरही तिच्या या डीप नेक गाऊनची अनेक दिवस चर्चा होती. आताही प्रियंका तिच्या एका ड्रेसमुळे चर्चेत आलीय. कारण काय तर या ड्रेसची किंमत.मायामीमधील एका इव्हेंटमध्ये प्रियंका हा ड्रेस घालून दिसली. जिराफ प्रिंटचा हा यॅलो व ब्राऊन कलरचा हा शॉर्ट ड्रेस लगेच सर्वांच्या डोळ्यांत भरला. या फ्रंट डीप नेक ड्रेसमध्ये प्रियंका खूपच हॉट दिसत होती. या ड्रेसवर प्रियंकाने मल्टीलेयर चेन कॅरी केली होती. तसेच या ड्रेसला बेल्टने टाय केले होते.

या ड्रेसमध्ये प्रियंकाचा लुक एकदम खुलून दिसत होता. म्हणायला हा ड्रेस तुलनेने फार सिंपल होता. पण या सिंपल दिसणा-या ड्रेसची किंमत तुम्हाला माहित आहे का?  

 या ड्रेसची किंमत 3,200 पौंड आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ही किंमत 2,95, 046 रुपये एवढी आहे. या ड्रेसवर प्रियंकाने जो बेल्ट लावला आहे. त्याची किंमत 2150 ब्रिटीश पौंड एवढी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार 1,98 086 रुपये आहे. हा ड्रेस आणि बेल्टची किंमत एकत्र केली तर या ड्रेसची एकूण किंमत 493,132 रुपये आहे.  

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर ती हॉलिवूडचा चित्रपट ‘मॅट्रिक्स’च्या चौथ्या भागात दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

  

टॅग्स :प्रियंका चोप्रा