Join us
Daily Top 2Weekly Top 5

निक जोनासने धोनी, ईशान खट्टरसोबत खेळली फुटबॉल मॅच! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 10:50 IST

 प्रियांका चोप्राचा मंगेतर निक जोनास सध्या भारतात आहे आणि पीसीसोबत वेळ घालवतोय. काल निक जोनास मुंबईतील फुटबॉल ग्राऊंडवर फुटबॉल खेळताना दिसला. 

 प्रियांका चोप्राचा मंगेतर निक जोनास सध्या भारतात आहे आणि पीसीसोबत वेळ घालवतोय. काल निक जोनास मुंबईतील फुटबॉल ग्राऊंडवर फुटबॉल खेळताना दिसला. तेही अनेक सेलिब्रिटींसोबत. होय, भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेन्द्र सिंग धोनी, अभिनेता ईशान खट्टर, आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत निक फुटबॉल खेळताना दिसला.

यावेळी निक आणि ईशान एका टीममध्ये होते तर धोनी त्यांच्या विरोधी टीममध्ये खेळत होता. तर प्रियांका आपल्या मैत्रिणींसोबत मैदानावर बसून ही मॅच एन्जॉय करत होती. या फुटबॉल मॅचचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

काही दिवसांपूर्वी प्रियांका व निक यांचा रोका झाला. यानंतर प्रियांका व निक लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे.

तूर्तास प्रियांका ‘स्काय इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात बिझी आहे. त्यामुळे तिचा मुक्काम सध्या भारतात आहे. तिला भेटण्यासाठी निक भारतात आला आहे.

२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. 

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्राइशान खट्टरआदित्य रॉय कपूर