Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राला अमेरिकेत या पद्धतीने द्यायचाय बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:12 IST

प्रियंका आणि निक लवकरच आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाने हॉलिवूडचा प्रसिद्ध सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली आहे. हे कपल चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बऱ्याचदा प्रियंका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा होताना दिसतात. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका आणि निक लवकरच आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. मात्र याआधी २०१९ मध्ये प्रियंका आणि निकच्या निकटवर्तीयाने असे सांगितले होते की या जोडप्यावर मुलाबाबत कोणताही दबाव नाही आणि ते दोघेही व्यावसायिकरित्या प्रतिबद्ध आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंकाने म्हटले होते की, मला देखील लवकरच आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्ही दोघे सुद्धा व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघे सुद्धा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच आमच्यात अजून पर्यंत असे काही झाले नाही पण येत्या काही दिवसांतच आम्ही आमच्यासाठी वेळ काढू. आम्ही आमच्या बाळाचा निर्णय घेणार आहोत.

तसेच तिने आपल्या बाळासाठी काही प्लॅन देखील केला आहे. तिची इच्छा आहे की तिच्या बाळाचा जन्म हा लॉस अँजेलिसमध्येच व्हावा, कारण प्रियांकाचे ते सर्वात आवडते शहर आहे आणि तिच्या मते ती आणि तिचे बाळ मानसिक तसेच शारीरिक दृष्ट्या याठिकाणी अधिक चांगले राहील असा तिचा विश्वास आहे.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, प्रियंका शेवटी ‘द व्हाइट टाइगर’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात प्रियंका चोप्रासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास