Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोपडाला हवाय ‘असा’ नवरा अन् खूपसारी मुले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 21:51 IST

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी देसी गर्ल प्रियंका चोपडाला तिच्या कामाबरोबरच बिनधास्त वक्तव्य करण्यासही ओळखले जाते. वास्तविक प्रियंका तिच्या ...

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी देसी गर्ल प्रियंका चोपडाला तिच्या कामाबरोबरच बिनधास्त वक्तव्य करण्यासही ओळखले जाते. वास्तविक प्रियंका तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारसे बोलत नाही. पण यावेळेस मात्र प्रियंकाचा वेगळाच अवतार बघावयास मिळाला. तिने तिच्या आयुष्याबद्दल दिलखुलास बोलताना, तिला आयुष्याचा जोडीदार कसा असावा? याबाबतचा खुलासा केला आहे. प्रियंकाने कधीही तिच्या अफेअरच्या गॉसिप्सवर रिअ‍ॅक्ट केले नाही. पण एका मॅगझिनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या मनातील गोष्टी बोलून दाखविल्या. प्रियंकाने म्हटले की, ‘मला खूप मुले हवी आहेत. पण हे कुणासोबत होईल याबाबत मला काहीही माहिती नाही. मी बºयाच वर्षांपासून सिंगल आयुष्य जगत आहे. मला याविषयी बºयाचदा विचारणाही होते. परंतु मला आता याचे उत्तर द्यायचे आहे. चर्चेत राहण्यासाठी मी हे वक्तव्य करीत नाही, तर जे आहे ते खुलेपणाने सांगत आहे. मी लग्नाबद्दल खूप गंभीर आहे. शिवाय माझा परिवारही याविषयी विचार करीत आहे. त्यामुळे लवकरच मी याविषयी खुलासा करेल. पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, मी खूप भावनिक आणि रोमॅण्टिक आहे. त्यामुळे माझा पार्टनर जर मला एन्गेज ठेवू शकला नाही तर मी त्याच्यासोबत राहणार आहे. तो स्मार्ट असावा, माझी काळजी घेणारा असावा, असेही प्रियंकाने सांगितले. मात्र तो कोण आहे याबाबतचा तिने खुलासा केला नाही. परंतु ज्या पद्धतीने प्रियंका या विषयावर बिनधास्तपणे बोलली त्यावरून लवकरच ती याबाबतचाही खुलासा करेल, असेच काहीसे चित्र आहे.