‘न्यूटन’च्या आॅस्करवारीवर प्रियांका चोप्रा नाखूश! जाणून घ्या का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:52 IST
राजकुमार रावचा ‘न्यूटन’ भारताकडून आॅस्करला जाणार, या बातमीचा सर्वाधिक धक्का बसलाय तो अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला. होय, सर्वजण राजकुमारचे ...
‘न्यूटन’च्या आॅस्करवारीवर प्रियांका चोप्रा नाखूश! जाणून घ्या का?
राजकुमार रावचा ‘न्यूटन’ भारताकडून आॅस्करला जाणार, या बातमीचा सर्वाधिक धक्का बसलाय तो अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला. होय, सर्वजण राजकुमारचे अभिनंदन करत असताना तिकडे प्रियांकाचा चेहरा मात्र लटकलेला आहे. ‘न्यूटन’च्या आॅस्करवारीच्या बातमीवर प्रियांका जराही खूश नाही. कारण, प्रियांका व तिची आई मधु चोप्रा यांना भलतीच अपेक्षा होती. होय, त्यांचा ‘व्हेंटिलेटर’ हा मराठी सिनेमा आॅस्करसाठी जाईल, असे प्रियांका व तिच्या आईला वाटले होते. पण ‘न्यूटन’च्या नावाची घोषणा झाली अन् प्रियांकाचा पुरता हिरमोड झाला. ‘व्हेंटिलेटर’चे दिग्दर्शक राजेश यांनी अप्रत्यक्षपणे या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही सर्वजण २२ सप्टेंबर या तारखेची आतुरतेने प्रतीक्षा करत होता. ‘व्हेंटिलेटर’ हाच सिनेमा भारताकडून आॅस्करसाठी निवडला जाईल, याची आम्हाला खात्री होती. प्रियांकाच्या आईने मला आधल्या रात्री फोन केला होता. तेव्हाही मी त्यांना हीच खात्री दिली होती. पण ‘न्यूटन’च्या नावाची घोषणा झाली अन् आम्ही सगळेच निराश झालोत. माझ्या मते, प्रियांकाही या घोषणेनंतर निराश झाली असणार. कारण ‘व्हेंटिलेटर’ हा तिच्या प्रॉडक्शनचा तिचा सगळ्यात आवडता चित्रपट आहे, असे राजेश म्हणाले. तूर्तास पीसी या सगळ्यावर बोललेली नाही. पण एकंदर सांगायचे तर राजकुमार रावने प्रियांकाची चांगलीच निराशा केली आहे. आॅस्करमध्ये राजकुमारच्या चित्रपटाला हॉलिवूड सुपरस्टार अँजेलिना जोली हिच्या ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ या चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार आहे. कारण अँजेलिनाच्या या चित्रपटालाही फॉरेन लँग्वेज कॅटेगिरीत एन्ट्री मिळाली आहे. आता हे कसे तर ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ नामक पुस्तकावर अँजेलिना जोलीचा हा सिनेमा आधारित आहे. खमेर आणि इंग्लिश भाषेत तो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कंबोडियातून ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर’ने या कॅटेगिरीत स्थान मिळवले आहे.ALSO READ : अखेर प्रियांका चोप्राला मागावी लागली माफी!या कॅटेगिरीत चित्रपट पाठवण्याची शेवटची तारीख २ आक्टोबर आहे. या चित्रपटांपैकी नऊ चित्रपटांची निवड होईल. यानंतर २०१८ च्या प्रारंभर पाच फायनल नॉमिनेशनची घोषणा केली जाईल. मार्च २०१८ मध्ये आॅस्कर पुरस्कार जाहिर होतील.