Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेम टू शेम!! प्रियांकासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या 'या' मुलींना पाहिलं का? व्हिडीओ पाहून व्हाल कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:45 IST

priyanka chopra: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणीकडे पाहिल्यावर ती केवळ प्रियांकाला फॉलोच करत नाही तर तिची जबरा फॅन असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजच्या घडीला ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूड असो वा हॉलिवूड प्रियांकाने तिच्या अभिनयाचा डंका दोन्ही क्षेत्रात वाजवला आहे. त्यामुळेच आज तिला असंख्य तरुणी फॉलो करताना दिसतात. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणीकडे पाहिल्यावर ती केवळ प्रियांकाला फॉलोच करत नाही तर तिची जबरा फॅन असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तिचा प्रत्येक लूक प्रियांकाप्रमाणे ती करते.

सध्या सोशल मीडियावर प्रियांकासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या मुलीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात या मुलीने अगदी प्रियांकासारखा मेकअप केला असून प्रत्येक व्हिडीओमध्ये तिच्याप्रमाणेच एक्स्प्रेशन्स दिले आहेत.त्यामुळे ही तरुणी प्रियांकाची कार्बन कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रियांकाप्रमाणेच हुबेहूब दिसणाऱ्या या तरुणीचं नाव अमायरा डोंगरे असून ती एक आर्टिस्ट आहे. अमायरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती प्रियांकाप्रमाणेच एक्स्प्रेशन्स देत व्हिडीओ शेअर करत असते. इतकंच नाही तर अमायराप्रमाणेच कॅऩडामध्ये राहणारी नवप्रीत बंगादेखील प्रियांकाप्रमाणेच दिसते. त्यामुळे सध्या प्रियांकासारख्या दिसणाऱ्या दोन मुलीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

दरम्यान, कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचे हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्ती पाहायला मिळतात. यात सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय या दिग्गज कलाकारांचेही हमशक्ल असल्याचं यापूर्वी दिसून आले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडसेलिब्रिटी