Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्लिन येथे पंतप्रधान आल्याचे समजताच प्रियंका चोपडाने घेतली त्यांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 17:59 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या चार देशांच्या दौºयावर असून, ते जर्मनी, बर्लिन येथे पोहोचले आहेत. याचठिकाणी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या चार देशांच्या दौºयावर असून, ते जर्मनी, बर्लिन येथे पोहोचले आहेत. याचठिकाणी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाही तिच्या ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी पोहचली होती. तिला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे समजले तेव्हा तिने पंतप्रधानांची भेट घेण्याचे ठरविले. प्रियंकाने या भेटीला अविस्मरणीय क्षण संबोधताना मोदींबरोबरचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंना कॅप्शन देताना प्रियंकाने लिहिले की, ‘हा खूपच चांगला योगायोग आहे. पंतप्रधान मोदीजी बर्लिनला असताना मीही त्याठिकाणी होते. पीएम मोदी सर, धन्यवाद!  तुम्ही तुमच्या अतिशय व्यस्त वेळात मला भेटण्याची संधी दिली. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौºयावर असून, या दौºयात ते जर्मनी, स्पेन, रूस आणि फ्रांसला भेट देणार आहेत. या दौºयात पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण, ऊर्जामंत्री पीयूष गोयल आणि विदेश राज्यमंत्री एमजे अकबर यांचा समावेश आहे. या दौºयात ते भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासंदर्भात काही करार करणार आहेत. तर प्रियंका चोपडा गेल्या दीड वर्षांपासून न्यू यॉर्क येथे राहत असून, यादरम्यान ती खूपच कमी वेळा भारतात आली आहे. सध्या ती हॉलिवूडमध्ये अनेक प्रोजेक्टवर काम करीत असून, अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोच्या शूटिंगमध्ये ती सर्वाधिक व्यस्त असते. या शोमुळेच तिला ‘बेवॉच’ हा बड्या बॅनरचा चित्रपट मिळाला असून, सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध देशांमध्ये जात आहे. हा चित्रपट भारतात २ जून रोजी रिलीज होणार आहे. गेल्या सोमवारी मुंबई येथे या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. दरम्यान, या चित्रपटात अभिनेता ड्वेन जॉनसन मुख्य भूमिकेत असून, प्रियंका व्हिक्टोरियाच्या निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट अद्यापपर्यंत रिलीज झाला नसला तरी, प्रियंकाला आणखी एका दुसºया हॉलिवूडपटाची आॅफर मिळाली आहे.