Join us

प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 18:15 IST

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. पण यावेळी कारण खास आहे. होय, सध्या ती चर्चेत आहे ती ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीमुळे.

ठळक मुद्देप्रियंका चोप्रा 2017 मध्ये पहिल्यांदा निकला भेटली होती. त्यानंतर  2018 मध्ये प्रियंका आणि निकने लग्न केले होते.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सतत चर्चेत असते. पण यावेळी कारण खास आहे. होय, सध्या ती चर्चेत आहे ती ओप्रा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीमुळे. ओप्रा विन्फेला दिलेल्या या मुलाखतीत प्रियंकाने पर्सनल लाईफबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. निक जोनाससोबतच्या नात्यावरही ती बोलली. पण जे काही बोलले ते ऐकून अनेकजण हैराण झालेत. होय, निकच्या बाबतीत सुरुवातीला मी अजिबात गंभीर वगैरे नव्हते, असे प्रियंका या मुलाखतीत म्हणाली.

या मुलाखतीत प्रियंकाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. यावेळी प्रियंका म्हणाली, निकसोबत एका इव्हेंटमध्ये माझी भेट झाली होती. यानंतर निकने मला मॅसेज करायला सुरूवात केली. खरे सांगू तर निकच्या या मॅसेजकडे मी आधी अगदी दुर्लक्ष केले होते. कारण मला फ्लर्ट, डेट करण्यात अजिबात रस नव्हता. माझे वय 35 होते आणि मला आता लग्न करून आयुष्यात  सेटल व्हायचे होते. मला लग्न करायचे होते आणि मुले हवी होती. म्हणून मी निकच्या डेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत होते. पण  मी निकला प्रत्यक्ष डेटवर भेटले आणि त्या दिवसाने माझे आयुष्यच बदलले. निकने मला खूप प्रभावित केले. तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता. पण त्याचा समजुतदारपणा मला प्रभावित करून गेला. 

 इतक्या कमी वयात इतका समझदार व्यक्ती मी त्याआधी पाहिला नव्हता.  माझ्या स्वप्नांबद्दल इतका उत्साही, माज्या प्रत्येक अचिव्हमेंटवर इतका आनंदी होणारा मुलगा मी पाहिला नव्हता. म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडले.’ प्रियंका चोप्रा 2017 मध्ये पहिल्यांदा निकला भेटली होती. त्यानंतर  2018 मध्ये प्रियंका आणि निकने लग्न केले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास