Join us

​प्रियंका लवकरच येतेयं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 17:42 IST

‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझनचे काम संपवल्यानंतर  पीसी अर्थात प्रियंका चोपडाने आपल्या पहिल्या वहिल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाचे कामही संपवले आहे. ...

‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझनचे काम संपवल्यानंतर  पीसी अर्थात प्रियंका चोपडाने आपल्या पहिल्या वहिल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाचे कामही संपवले आहे. या हॉलिवूडपटात प्रियंकाने ‘व्हिक्टोरिया’ नामक खलनायिकेची भूमिका साकारली आहे. या नावाच्या लोकप्रीय मालिकेवर आधारित हा चित्रपट आहे. गतरात्री प्रियंकाने या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. यावेळी चित्रपटातील स्टारकास्टसोबत ती पार्टी करताना दिसली. या सेलिब्रेशनचे एक छायाचित्र पीसीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात पीसीची हटके लूक लाजबाव आहे. शूटींग पूर्ण झाल्याने प्रियंका लवकरच मुंबईत परतणार आहे. मुंबईत अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट प्रियंकाच्या प्रतीक्षेत आहेत. अर्थात या प्रोजेक्टवर काम सुरु करण्याआधी प्रियंका लहानसा ब्रेक घेणार असल्याची माहिती आहे.