Join us

प्रियंका चोप्राच्या या पिवळ्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल, दोन-तीन लाखांचा विचार तर अजिबात करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 12:03 IST

Priyanka chopra shares pic in a yellow dress on instagram :

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास नेहमीच तिच्या लूकला घेऊन चर्चेत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर यलो ड्रेसमध्ये एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. प्रियंकाच्या या फोटोवर तिचे चाहतेसुद्धा जोरादर कमेंट्स करतायेत. प्रियांकाच्या या  फोटोवर आत्तापर्यंत 17 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हा फोटो पोस्ट प्रियांकाने लिहिले की, "या दिवसात सूर्याचा प्रकाशा एक वेगळ्या प्रकारचा परिणाम करतोय. या फोटोत प्रियंका खूपच सुंदर दिसते आहे. बाजारात या ड्रेसची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.  सोशल मीडिया अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोवर प्रतिक्रिया देऊन प्रियंकाचे कौतुक केले आहे.

प्रियंकाने वयाच्या १७व्या वर्षी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तिचा हा प्रवास खूपच रंजक ठरला आहे. मिस इंडिया ते बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ होण्याचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्येही आपला अभिनयाची चुणूक दाखविली. प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती 'द व्हाइट टाइगर' चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. लवकरच ती सॅम ह्यूएन आणि सेलिन डायॉनसोबत ‘टेक्स्ट फॉर यू’आणि कियानू रीव्ससोबत ‘मॅट्रिक्स 4’ या सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा