Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त हेच पाहायचं बाकी होतं...! प्रियंका चोप्रानं शेअर केला निकसोबतचा फोटो, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 11:05 IST

इन्स्टाग्रामवर प्रियंकाने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. पण काहींनी मात्र यावरून प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलंय.

ठळक मुद्दे प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड सिनेमात ती अखेरची दिसली होती. तूर्तास तिच्याकडे अनेक हॉलिवूड सिनेमे आहेत.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra ) सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. पण म्हणून चर्चा कमी नाही. या ना त्या कारणाने प्रियंका सतत चर्चेत असते. सध्या प्रियंका लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड सिनेमाचं शूटींग करतेय. तूर्तास मात्र प्रियंका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या काही चाहत्यांना आवडला आहे. पण काहींनी मात्र यावरून प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलंय. असे फोटो शेअर करायला लाज वाटत नाही का? अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या फोटोवर पाहायला मिळताहेत.  या फोटोत प्रियंका निक जोनाससोबत ( Nick Jonas) आहे. बिकिनी घातलेली प्रियंका लेटलेली आहे. हा फोटो शेअर करताना प्रियंकाने स्वत:ला स्रॅक्स म्हटले आहे.

हा फोटो पाहून काहींचा पारा चढला. मग काय या लोकांनी प्रियंकाला चांगलंच ट्रोल केलं. भारतातून गेलीस आणि जणू सर्व लाज विकून खाल्ली, अशी संतप्त कमेंट एका युजरने केली. ‘कर दिया भारत का नाम रोशन,’ अशा उपरोधिक शब्दांत एका युजरने आपला राग व्यक्त केला.

तुला वेड लागलं की काय, विदेशी मुलासोबत लग्न केलंस याचा अर्थ भारतीय संस्कृती विसरून जा असा होत नाही, असं एका युजरने तिला सुनावलं. आता हेच पाहायचं बाकी होतं, अशी कमेंट एका युजरने केली.

 प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ‘द व्हाईट टायगर’ या बॉलिवूड सिनेमात ती अखेरची दिसली होती. तूर्तास तिच्याकडे अनेक हॉलिवूड सिनेमे आहेत. सिटाडेल, टेक्स्ट फॉर यू, मॅट्रिक्स 4 या हॉलिवूड सिनेमात ती दिसणार आहे. याशिवाय ‘जी ले जरा’ या चित्रपटात ती आलिया भट व कतरिना कैफसोबत झळकणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास