Join us

​ प्रियांका चोप्रा म्हणते, माझ्या यशावर केवळ माझा हक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 11:29 IST

हॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा  सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. अलीकडे कपड्यांवरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल ...

हॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा  सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. अलीकडे कपड्यांवरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली. गाला अवार्ड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान घातलेल्या कपड्यांवरून प्रियांका ट्रोल झाली.  पण बिनधास्त प्रियांकाने याची जराही पर्वा केली नाही. मी कुणासाठीही बदलणार नाही, हे तिने ठणकावून सांगितले.   गोलकास्ट फेसबुक पेजने नुकतीच प्रियांकाची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रियांका अगदी बिनधास्त बोलली.  मी जशी आहे तशीच तुम्हाला आवडत असेन तर उत्तम आणि  आवडत नसेन त मला मला त्याची अजिबात पर्वा नाही. मी अशीच आहे, अशीच असणार. मी अमेरिकेत  असेन किंवा भारतात माझा मूळ स्वभाव मी कधीच बदलत नाही. केवळ माझ्या मूल्यांशी मी प्रामाणिक असते. मी दुसºया देशात जातेय म्हणून मला स्वत:ला बदलावे लागेल.माझ्या सवयी बदलाव्या लागतील.असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही फार विचार करताहात, असे प्रियांकाने बेधडक सांगितले. जसे आहात तसे राहा, जगासाठी बदलू नका. तुम्हाला रोज तेच रटाळ आयुष्य जगायचे आहे की प्रवाहाविरोधात जाऊन आपले वेगळे स्थान निर्माण करायचे आहे, हा पर्याय तुमचा आहे. जेव्हा प्रवाहाविरोधात जाऊन तुम्ही जे काही थोडे यश संपादन करता, ते फक्त तुमचे यश असेल. ते इतरांसारखे रटाळ नसेल. जगातील इतर यशस्वी लोकांप्रमाणे न राहता मी माझा मार्ग स्वत: निवडेन, जे फक्त माझे असेल, त्यातून मिळालेल्या यशावर फक्त माझा हक्क असेल, असेही तिने सांगितले.या मुलाखतीतून आत्मविश्वासाने भरलेली प्रियांकाच तेवढी दिसली. कदाचित हाच आत्मविश्वास प्रियांकाच्या यशाचे गमक आहे.