Join us

प्रियंकाची आईही सोशल मीडियावर ट्रोल, मधू चोप्रांचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकऱ्यांमध्येच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:40 IST

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा या डॉक्टर आहेत.

विचित्र कपडे घातल्याने सेलिब्रिटी ट्रोल होताना आपण पाहिलं आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या फॅशन सेन्सवरुन काहीही लिहिलं जातं. मात्र या सगळ्याची आता त्यांना सवय झाली आहे. दरम्यान सेलिब्रिटींचे आईवडीलही आता ट्रोल होत आहेत. होय, देसी गर्ल प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा (Madhu Chopra) त्यांच्या ट्रान्सपरंट टॉपमुळे ट्रोल झाल्या आहेत. ट्रोल करणाऱ्यांना इतर नेचकऱ्यांनी धारेवर धरलं आहे.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रा या डॉक्टर आहेत. शिवाय त्या निर्मात्याही आहे. नुकतंच त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींबरोबर एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून बाहेर पडताना पाहिलं गेलं. यावेळी पापाराझी तिथे जमले आणि त्यांनी मधू चोप्रा यांना कॅमेऱ्यात कैद केलं. यावेळी मधू चोप्रा यांनीही त्यांच्या मैत्रिणीसोबत कॅमेऱ्याकडे पाहून पोज दिली. नंतर त्या गाडीत बसल्या. दरम्यान नेटकऱ्यांची नजर त्यांच्या ट्रान्सपरंट टॉपवर गेली. झालं तर मग मधू चोप्राही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना धारेवर धरलंय. 'प्रियंका पाहिलंस का तुझ्या आईने हे काय घातलंय?','असे ड्रेस घालण्यासाठी तुमचं वय खूप जास्त आहे','उर्फीची आजी वाटते' अशा विचित्र कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. तर काही जणांनी या ट्रोलर्सलाच निशाण्यावर घेतलं आहे. 'हे चुकीचं आहे त्या एका अभिनेत्रीच्या आई आणि स्वत: डॉक्टर आहेत','वयस्कर महिलेला ट्रोल करणं बंद करा' अशा कमेंट्सही आल्या आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासोशल मीडियाट्रोल