Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका निकच्या लाडाची, अंगठी तिची लाखमोलाची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:32 IST

प्रियांका चोप्राचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यातून तिचा साखरपुडा झाल्याचा खुलासा झाला आहे. 

(Image CRedit : www.elitedaily.com)

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या साखरपुड्याची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाचे अंदाज बांधले जात आहेत. असे बोलले जात आहे की, येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये दोघे लग्न बंधनात अडणार आहेत. दरम्यान प्रियांकाचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यातून तिचा साखरपुडा झाल्याचा खुलासा झाला आहे. 

एका पार्टीमध्ये रवीना टंडन आणि प्रियांका चोप्राने सेल्फी काढला आणि रवीनाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोशल मीडियावर हा फोटो येताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या फोटोत प्रियांकाने डायमंड रिंग घातल्याचे दिसत आहे. या रिंगवरुनच तिचा साखरपुडा झाल्याचं पक्क मानलं जात आहे. 

अशातच आता या रिंगच्या किंमतीची चर्चा होऊ लागली आहे.  harpersbazaar.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने घातलेल्या रिंगची किंमत तब्बल २०० हजार डॉलर इतकी आहे. म्हणजे भारतीय किंमत १.५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. एका आंतरराष्ट्रीय जेमोलोजिस्टनुसार, ही ५ कॅरेटची रिंग आहे. रिंगमध्ये असलेल्या डायमंडला कुशन कट डायमंड म्हटले जाते. हा डायमंड सर्वात महागड्या डायमंडपैकी एक आहे. 

प्रियांकाच्या या रिंगमुळे तिने साखरपुडा केल्याची चर्चा तर होत आहे. पण तिने किंवा निकने अजूनतरी अधिकृतपणे याबाबत काहीही सांगितले नाहीये. त्यामुळे आता ते याबाबत कधी सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास