Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chopra: लेक मालतीसाठी देशही सोडू शकते प्रियंका चोप्रा, देसीगर्लने केला हैराण करणार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:12 IST

प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करते आहे.

प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमुळे खूप चर्चेत आहे. या वेबसीरिजमुळे तिने भरपूर अॅक्शन सीन्स दिले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडतात. यादरम्यान तिच्याकडे इतरही अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्याचवेळी प्रियंकाने तिच्या करिअर आणि मुलगी मालतीबाबतही अनेक खुलासा केला आहे.

प्रियंका चोप्रा जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. तिची मुलगी एक वर्षाची आहे. प्रियंका अनेकदा तिच्या मुलीबद्दल बोलताना दिसतेय. प्रियंकाची कारकीर्दही सध्या चांगलीच सुरू आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान प्रियंकाने म्हटले आहे की, ती मालतीसाठी तिचे करिअरही सोडू शकते.

प्रियंका म्हणते की, जर मालती म्हणाली की, मला देश बदलायचा आहे, तर तीही ते करायला तयार आहे. प्रियंका एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, 'त्यावेळी मी हे गृहीत धरले होते, की ते पूर्णपणे आपल्या पालकांचे काम आहे. माझे करिअर महत्त्वाचे आहे.

प्रियंका चोप्रा पुढे म्हणाली, 'मी माझ्या पुस्तकावर काम करेपर्यंत याचा विचार केला नव्हता. मग मी विचार केला की आता मी 40 वर्षांचा आहे. आता मला माझे करियर सोडून देश बदलण्यास सांगितले जाईल, ते मी माझ्या मुलीसाठी  करेन. प्रियंका म्हणाली की हा मोठा त्याग आहे आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असे पालक मिळाले ज्यांनी हे केले.

प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करते आहे. अचानक तिने तिथे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. पण यामागचे कारण मध्यंतरी तिने स्पष्ट केले होते. बॉलिवूडमधील राजकारण, कंपूशाही अशा वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळून तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा