Join us

 मी भीक मागते, कृपा करा आणि़...! भारतीय चाहत्यांना प्रियंका चोप्राने केली कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:58 IST

प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. पण विदेशात राहून तिला मायदेशीच्या लोकांची चिंता सतावते आहे.

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे प्रियंकाचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती हॉलिवूडच्या काही सिनेमात दिसणार आहे.

भारतात कोरोनामुळे (corona) हाहाकार माजला आहे. रोज शेकडो मृत्यू होत आहेत. रूग्णालयात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा आहे. अशास्थितीत सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. देशातील कोरोना महामारीची ही स्थिती बघून सर्वांनाच धडकी भरली आहे. दूर न्यूयॉर्कमध्ये बसलेली अभिनेत्री प्रियंका चोप्राही (Priyanka Chopra)  भारतातील ही स्थिती बघून चिंतीत आहे.अशात तिने भारतातील आपल्या सर्व चाहत्यांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

तिने लिहिले, ‘संपूर्ण भारतात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. देशातील वेगवेगळ्या भागातील फोटो व स्टोरीज पाहतेय. हे चित्र प्रचंड भीतीदायक आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. कृपा करून घरात राहा. मी तुमच्यापुढे भीक मागते, कृपा करून घराबाहेर पडू नका. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, शेजा-यांसाठीही हे गरजेचे आहे. प्रत्येक एक डॉक्टर आणि फ्रंट लाइन वर्करही हेच सांगतो आहे.. घराबाहेर पडावेच लागले तर मास्क लावा. महामारीचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. लस घ्या़ यामुळे आपल्या वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल,’ असे प्रियंकाने लिहिले आहे.

प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. पण विदेशात राहून तिला मायदेशीच्या लोकांची चिंता सतावते आहे. तिच्या या पोस्टवरून तरी हेच दिसतेय.तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे तिचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती हॉलिवूडच्या काही सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राकोरोना वायरस बातम्या