Join us

प्रियंका चोप्राने का निवडला १० वर्षांनी लहान नवरा? अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 08:00 IST

गतवर्षी प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा झाली. प्रियंका आणि निक यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला.

ठळक मुद्देप्रियंका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतते आहे. सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात ती झळकणार आहे.

गतवर्षी प्रियंका चोप्राने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले. साहजिकच या लग्नाची जोरदार चर्चा झाली. प्रियंका आणि निक यांच्या वयातील अंतर चर्चेचा विषय ठरला. ३६ वर्षांच्या प्रियंकाने २६ वर्षांच्या निकशी लग्न करावे, हे काही जणांना खटकले. यावरून दोघांची खिल्लीही उडवली गेली. आत्तापर्यंत प्रियंका यासंदर्भात काहीही बोलली नव्हती. पण एका ताज्या मुलाखतीत मात्र ती यावर बोलली. शिवाय तिच्या व निकच्या वयातील अंतरावरून ट्रोल करणाºयांना तिने सडेतोड उत्तरही दिले.

‘लोक माझ्या व निकच्या नात्याबद्दल वाट्टेल ते बोलतात. आमच्यातील वयाच्या अंतरावरून प्रश्न उपस्थित करतात. खरे तर या प्रश्नांचे मला आश्चर्य वाटते. एखाद्या मुलीने वयाने मोठा साथीदार निवडला तर ते लोकांना चालते. पण एका मुलाने स्वत:पेक्षा मोठ्या वयाच्या मुलीसोबत लग्न केलेले लोकांना रूचत नाही. हा सगळाच मला दुटप्पीपणा वाटतो,’ असे प्रियंका यावेळी म्हणाली.

वयाने लहान असलेल्या निकसोबत लग्न का केले, याचे उत्तरही प्रियंकाने यावेळी दिले. माझ्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. प्रेम माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. एकमेकांवर खरे प्रेम करणारे दोघे लग्न करतात, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रियंका म्हणाली.

गत वर्षी डिसेंबर महिन्यात प्रियांका-निक लग्नाच्या बेडीत अडकले होते. भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. तेव्हापासून ही जोडी कायम या ना त्या कारणाने चर्चेत असते. निकसोबत लग्न करण्यासाठी  प्रियांकाने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट नाकारला होता. पण आता प्रियंका पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये परतते आहे. सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात ती झळकणार आहे. यामध्ये झायरा वसीम, रोहित सराफ आणि फरहान अख्तर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास