Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक मालतीसह प्रियांका चोप्रा अयोध्येत, निक जोनसनेही घेतले रामललाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:14 IST

प्रियांकाने नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं आहे. प्रियांकासह तिचा पती निक जोनसही रामललाच्या चरणी नतमस्तक झाला.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच भारतात आली आहे. लेक मालती आणि पती निक जोनसही प्रियांकासह भारतात आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या लेक ईशा अंबानींच्या होळी पार्टीत प्रियांका दिसली होती. याचे फोटोही तिने शेअर केले होते. आता प्रियांका कुटुंबीयांसह अयोध्येत पोहोचली आहे. 

प्रियांकाने नुकतंच अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं आहे. प्रियांकासह तिचा पती निक जोनसही रामललाच्या चरणी नतमस्तक झाला. लेक मालतीला घेऊन प्रियांका रामललाच्या दर्शनाला गेली होती. प्रियांकाने यावेळी खास पारंपरिक लूक केला होता. पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये प्रियांका दिसून आली. तर निक जोनस आणि लेक मालती यांनीही पारंपरिक पोशाख परिधान केला होता. राम मंदिरातील प्रियांका चोप्राचे काही फोटो समोर आले आहेत. 

अयोध्येतील राम मंदिराचा २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासराम मंदिरअयोध्या