जोधपूर- प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये जोरदार आतषबाजी झाली आहे. या आतषबाजीमुळे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. राजस्थानमधल्या जोधपूर इथल्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये विवाह झाल्यानंतर जवळपास मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.लग्नानंतर जवळपास तीन मिनिटांपर्यंत ही फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. या फटाकेबाजीचा सोशल मीडियावरून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरून प्रियंका आणि निकच्या लग्नादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीला युजर्सनी असंवेदनशील म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजर्सनं आता कुठे गेले सर्वोच्च न्यायालयाचे नियम, असा टोला लगावला आहे.
Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 00:52 IST
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले आहेत.
Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नातल्या आतषबाजीमुळे ट्रोल झाले प्रियंका चोप्रा आणि निक जोनास
ठळक मुद्देप्रियंका चोप्रा आणि निक जोनास ख्रिश्चन पद्धतीनं विवाह बंधनात अडकले लग्नानंतर जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये जोरदार आतषबाजी झाली आतषबाजीमुळे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास पुन्हा एकदा ट्रोल झाले