Join us

‘देसी गर्ल’च्या घटस्फोटाची चर्चा किती खरी, किती खोटी? वाचा, Priyanka Chopraची आई काय म्हणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:24 IST

एकीकडे घटस्फोटाची चर्चा, दुसरीकडे प्रियंकाची कमेंट..., म्हणून हटवलं ‘जोनास’ सरनेम?

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने सोशल मीडियावर एक बदल केला आणि प्रियंका पती निक जोनासपासून  (Nick Jonas ) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. होय, प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘जोनास’ हे (Priyanka Chopra Remove Surname) आडनाव काढून टाकलं आणि यानंतर तिच्यात आणि निकमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण आता प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा यांनी प्रियंका व निकच्या घटस्फोटाच्या चर्चा फेटाळून लावल्या. या चर्चा खोट्या आणि बिनबुडाच्या आहेत. यात काहीही तथ्य नाही. प्रियंका व निक यांच्यात सर्व काही ठीक आहे. कृपा करून अशा अफवा पसरवू नका, असं त्या म्हणाल्या.

म्हणून प्रियंकाने हटवलं पतीचं आडनाव?सोशल मीडियावरून ‘जोनास’ हे नाव हटवल्यावर त्याची चर्चा होईल, हे प्रियंकाला ठाऊक होतं. चर्चा खरी मानाल तर तिने हे फक्त तिच्या पतीला म्हणजे निक जोनासला चर्चेत आणण्यासाठी केलं. जोनास ब्रदर्सचा एक नवा प्रोजेक्ट आज नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. जोनास ब्रदर्सचा कोणताही प्रोजेक्ट येणार असला की प्रियंका कमालीची अ‍ॅक्टिव्ह होते. शिवाय आपल्या चाहत्यांनाही अ‍ॅक्टिव्ह करण्याचं काम ती शिताफीने करते. त्यामुळे कदाचित हा प्रमोशनचा एक भाग असावा, असं मानलं जातंय.

 घटस्फोटाची चर्चा अन् प्रियंकाची कमेंट

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान निक जोनासने काही तासांपूर्वी इन्स्टावर आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात निक हार्ड वर्कआऊट करताना दिसतोय. प्रियंकाने त्याच्या या व्हिडीओवर कमेंट केली  आणि तिच्या या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.‘गजब, मी फक्त तुझ्या बाहुपाशात मरू इच्छितो,’अशी कमेंट तिने केली आहे. सोबत हार्टवाला इमोजी सुद्धा आहे. तिच्या या कमेंटवरून तरी तिच्यात व निकमध्ये सर्व काही ठीक असल्याचं वाटतंय.  निक आणि प्रियंकाने नुकतंच नवीन घर घेतलं असून या घरात दोघं राहायला गेले आहेत. घराचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. दोघांनी 1 डिसेंबर 2018 रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास