Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपूर्वी या तरूणाने केले होते प्रियंका चोप्राशी लग्न? वाचा, काय आहे Viral सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 09:34 IST

मजेदार किस्सा

ठळक मुद्देप्रियंकाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्रियंका चोप्राचा पती कोण ?असा प्रश्न करणा-या लोक मूर्खात काढतील. कारण दोन वर्षांपूर्वीच प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाची देशातच नाही तर जगभर चर्चा झाली होती. अशात प्रियंकासोबत आपले सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते, असे कुणी म्हणत असेल तर लोक त्याला वेड्यात काढतील. पण सोशल मीडियावर एक तरुणाने सहा वर्षांपूर्वी प्रियकाशी आपले लग्न केल्याचे सांगत मजेदार किस्सा शेअर केला आहे. या तरुणाने प्रियंकासोबतचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. सध्या हा फोटो तुफान व्हायरल होतोय. तर आता हा अख्खा मामला काय ते वाचा. या लग्नाचा किस्सा बराच मजेदार आहे. होय, Brandon Schuster नावाच्या एका तरूणाने त्याने 2014 मध्ये प्रियंकाशी लग्न केल्याचे सांगत हा मजेदार किस्सा शेअर केला आहे.  Brandon Schuster ची ही पोस्ट अमेरिकन अभिनेत्री Chrissy Teigen रिट्विट केली आहे.

 त्याने प्रियंकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.  यात प्रियंकाच्या गळ्यात फुलांचा हार आहे आणि ती हसत हसत त्या तरुणाशी काहीतरी बोलताना दिसत आहे. या फोटोसोबत Brandonने त्यावेळचा मजेदार किस्सा शेअर केला आहे.

त्याने लिहिले,  2014 मध्ये मी प्रियंका चोप्राशी ‘लग्न’ केले होते. मी ताम्पा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये तिचे स्वागत करताना तिच्या गळ्यात दोन फुलांच्या माळा घातल्या होत्या. अशाप्रकारे फुलांचे हार गळ्यात घालणे हे भारतीय संस्कृतीत लग्नाचे प्रतिक मानले हाते, हे त्यावेळी मला माहित नव्हत़े. यानंतर भारतीय प्रसार माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती आणि दुस-या दिवशी मीडियाला एक्सक्ल्यूसिव्ह इंटरव्ह्यू देत होतो.’

ही ट्विटर पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.  हा किस्सा ऐकल्यावर सर्वच अवाक झाले आहेत. मात्र प्रियंकाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता ती काय प्रतिक्रिया देते ते बघूच.

टॅग्स :प्रियंका चोप्रा