Join us
Daily Top 2Weekly Top 5

इशिता कुमारचा हा टोमणा प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थसाठी तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 12:31 IST

एकीकडे प्रियंका चोप्रा लग्नानंतर आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाईफमध्ये आनंदी आहे. दुसरीकडे पीसीचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या आयुष्यात मात्र फार काही ठीक नसलेले दिसतेय. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले.

ठळक मुद्देया पोस्टमध्ये खरे तर सिद्धार्थचा कुठलाही उल्लेख नाही. पण ही पोस्ट सिद्धार्थसाठीच आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.

एकीकडे प्रियंका चोप्रा लग्नानंतर आपल्या पर्सनल व प्रोफेशनल लाईफमध्ये आनंदी आहे. दुसरीकडे पीसीचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या आयुष्यात मात्र फार काही ठीक नसलेले दिसतेय. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचे लग्न मोडले. होय, इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न होणार होते. पण ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आले. यानंतर अचानक प्रियंकाने आपल्या होणा-या वहिणीला म्हणजे इशिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. इशितानेही आपल्या सोशल अकाऊंटवरचे सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केलेत आणि सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढे हे लग्न तुटल्याची बातमी आली. प्रियंका व सिद्धार्थची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.मधु चोप्रांच्या या खुलाशानंतर हे प्रकरण इथेच संपले असे अनेकांना वाटले. पण कदाचित इशिता अद्यापही यातून  बाहेर पडलेली नाही. इशिताची ताजी पोस्ट तरी हेच सांगणारी आहे.

‘पुरूष तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकत नाहीत. आता हाय ब्लड प्रेशर...’, अशी पोस्ट तिने केली. तिच्या या पोस्टमध्ये खरे तर सिद्धार्थचा कुठलाही उल्लेख नाही. पण ही पोस्ट सिद्धार्थसाठीच आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही. तुझ्या पोस्टचा अर्थ सिद्धार्थ का? असा प्रश्न त्यामुळेच अनेकांनी इशिताला केला.

 

सिद्धार्थसोबतचे लग्न मोडल्यानंतर इशिता लंडनला परतली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका बिल्डींगचा फोटो शेअर करत, ‘लंडनला परतले. आता पुन्हा कामावर लक्ष देण्याची वेळ..’,अशी पोस्ट टाकली होती.

प्रियंका चोप्राच्या भावाचे लग्न मोडण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील लग्न व्हायला काही दिवस शिल्लक असतानाच त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. सिद्धार्थचे 2015 मध्ये कनिका माथुरसोबत लग्न होणार होते.   पण लग्नाची सगळी तयारी झाली असताना हे लग्न अचानक मोडले.

लग्न मोडण्याचे कारण सांगण्यात आले नसले तरी सिद्धार्थनेच सोशल मीडियावर पोस्ट टाकत, सिंगल... रेडी टू मिंगल लिहित लग्न मोडल्याचे सगळ्यांना सांगितले होते.  

टॅग्स :प्रियंका चोप्रा