Join us

व्वा दाजी! निक जोनासच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा भारी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:32 IST

सोलापुरी चादरीपासून इतका सुंदर शर्ट बनवला जाऊ शकतो, अशी कल्पनाही सामान्यांच्या मनात येणार नाही. पण निकला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

ठळक मुद्देनिकने घातलेल्या शर्टवर ‘चाटला आर’ असा ट्रेडमार्क दिसतोय. याचा अर्थ काय तर शर्टसाठी वापरली गेलेली चादर सोलापुरातील चाटला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तयार झाली आहे.

प्रियंका चोप्राचा हटके लूक नेहमी चर्चेत असतो. पण आपल्या दाजींची चर्चाही कमी नाहीये. होय, सध्या प्रियंकांचा (Priyanka Chopra ) नवरा निक जोनास ( Nick Jonas) त्याच्या एका हटके आऊटफिटमुळे चर्चेत आला आहे. होय, सोलापुरी चादर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहेच. आता याच सोलापुरी चादरीपासून बनवलेल्या दाजींच्या शर्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.खरं तर या चादरीपासून इतका सुंदर शर्ट बनवला जाऊ शकतो, अशी कल्पनाही सामान्यांच्या मनात येणार नाही. पण निकला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अलीकडे सेंट लुईसमधील एका कार्यक्रमात निक जोनास सोलापुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घालून सहभागी झाला. आता अशात त्याच्या शर्टची चर्चा रंगणार नाही तर नवल? त्याच्या या शर्टमुळे सोलापुरी चादरही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

निकने घातलेल्या शर्टवर ‘चाटला आर’ असा ट्रेडमार्क दिसतोय. याचा अर्थ काय तर शर्टसाठी वापरली गेलेली चादर सोलापुरातील चाटला टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये तयार झाली आहे. आता आपल्या फॅ्रक्टरीत तयार झालेल्या चादरीचा शर्ट चक्क अमेरिकन पॉपस्टार निक जोनासनं घालावा, याचा अभिमान तर वाटणारचं? चाटला टेक्सटाईलचे मालक गोवर्धन चाटला यांचाही ऊर अभिमानानं भरून आला.

याबाबत बोलताना चाटला टेक्सटाइल इंडस्ट्री चे गोवर्धन चाटला म्हणाले , चाटला टेक्स्टाईल इंडस्ट्रिजमध्ये दरवर्षी फॅशन डिजाईन शिकणारे विद्यार्थी इंटनर्शिपसाठी येत असतात. तसेच देशभरात देखील चादरचे डिलर आहेत.त्यांच्यामाध्यमातून ही चादर अर्थात हा चादरीपासून बनवलेला शर्ट निक यांच्यापर्यंत पोहोचला असावा. निक जोनासने सोलापुरी चादरीपासून शिवलेला शर्ट घातल्याचे फोटो आम्ही पाहिले आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि अभिमानही वाटला. सोलापूरकर म्हणून याचा अभिमान वाटतोय, असंही गोवर्धन चाटला म्हणाले.

टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्रा