Join us

​संयुक्त राष्ट्राच्या जागतिक नागरिक महोत्सवाची होस्ट करणार प्रियांका चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:42 IST

२४ सप्टेंबर १६ रोजी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव प्रसंगी प्रियांका चोप्रा होेस्ट करणार ...

२४ सप्टेंबर १६ रोजी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव प्रसंगी प्रियांका चोप्रा होेस्ट करणार आहे. प्रियांकासह नावाजलेले टीव्ही कलाकार सेठ मेयेर्स, नील पॅट्रीक हॅरीस, सलमा हायेक पिनॉल्ट आणि अन्य कलाकारदेखील होस्ट करणार आहेत. अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार असून केण्ड्रीक लमर, मेचॅलीका, रिहाना, मेजर लेझर. युशेर, एली गोल्डींग, सेलेना गोमेझ यांसारखे कलाकार यात सहभागी होणार आहेत. याबाबतच ट्विटरवर गायक युशेर बरोबरचा फोटो तिने शेअर केला. ती म्हणाली, ‘युशेर बरोबर काम करताना खूप मजा आली. दिग्गज कलाकारांबरोबर संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करण्याची संधी मिळत आहे याचा मला अभिमान वाटत आहे.’