Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावर जखम, रक्त अन्...; प्रियांका चोप्राची अवस्था पाहून चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:47 IST

शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्राला दुखापत, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडबरोबरच प्रियांकाने हॉलिवूडही गाजवलं आहे. सध्या प्रियांका 'हेड ऑफ स्टेट' या तिच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रियांकाला दुखापत झाली आहे. प्रियांकाने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

प्रियांकाने मंगळवारी(१६ एप्रिल) तिच्या इन्स्टा स्टोरीवरुन एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं दिसत आहे. प्रियांकाच्या चेहऱ्यावर जखम दिसत असून त्यातून रक्तही आल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत प्रियांका म्हणते, "गेल्या कित्येत वर्षात मी दुखापत झालेले किती फोटो पोस्ट केले असतील हे सांगताही येणार नाही."  'हेड ऑफ स्टेट' या सिनेमात प्रियांका खतरनाक अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. याच अॅक्शन सीन्सच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीला दुखापत झाली आहे. या सिनेमात प्रियांकाबरोबर जॉन सीना आणि एद्रिस एल्बादेखील दिसणार आहेत. 

'बेवॉच' या सिनेमातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लव्ह अगेन', 'द मॅट्रिक रिसेरक्शन', 'इज नॉट इट रोमँटिक', 'ए किड लाइक जेक', 'क्वांटिको' या सिनेमांमध्ये ती दिसली. सिटाडेल या वेब सीरिजमध्येही प्रियांकाने काम केलं आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटी