Join us

प्रियांका चोप्राला लागली हॉलिवूड चित्रपटांची लॉटरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 12:35 IST

सध्या प्रियांका चोप्राचे स्टार सध्या जोरावर आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या ती यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये ...

सध्या प्रियांका चोप्राचे स्टार सध्या जोरावर आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या ती यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमध्ये नाहीच तर जगभरात एक ग्लोबल आयकॉन बनली आहे यात काही शंका नाही. मीडियाच्या रिपोर्टनुसार प्रियांकाच्या हाती हॉलिवूडचा आणखीन एक चित्रपट लागला आहे. ती हळूहळू आता हॉलिवूडवर राज करायला लागली आहे असे म्हटले वावगे ठरू नये. प्रियांका तिच्या आगामी चित्रपट वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.   बेवॉचचा दिग्दर्शक सेठ गॉर्डन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. प्रियांकाची मैत्रिणी मुबिना रेटोसन या चित्रपटाची निमिर्ती करते आहे ज्यात प्रियांकाची मुख्य भूमिका असणार आहे. सध्या याचित्रपटाबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. प्रियांकाने याआधी कधी ही वकिलाची भूमिका साकारलेली नाही. त्यामुळे तिच्या फॅन्सना याचित्रपटाची उत्सुकता नक्कीच असेल.  प्रियांका सध्या हॉलिवूडच्या दोन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'अ किड लाइक जेक' आणि 'इट्स इजंट रोमाँटिक.' दुसऱ्या चित्रपटात ती योगा अँम्बँसिडर आहे. प्रियांकाने अल्पावधीतच बॉलिवूड प्रमाणे हॉलिवूडमधील प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आहेत. प्रियांकाचे फॅन्स तिची बॉलिवूडमध्ये परतण्याची वाट मोठ्या आतुरतेने बघतायेत. संजय लीला भन्साळींच्या गुस्ताखियां चित्रपट प्रियांका झळकणार असल्याची चर्चा आहे. सध्या संजय लीला भंसाळी त्यांचा आगामी चित्रपट पद्मावतीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी याचित्रपटाचे शूटिंग सुरु करण्यात येईल असे समजते आहे. प्रियांकाच्या अपोझिट शाहरुख खान आणि इरफान खानच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रियांकाच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे