Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, काय लिहिलं आहे माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:09 IST

प्रियांका चोप्राच्या टॅटूची चर्चा, नेमकं काय आहे एवढं खास?

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या होळी पार्टीत ती दिसली होती. प्रियांका आणि लेक मालतीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. ईशा अंबानीच्या होळी पार्टीत सहभागी झालेल्या प्रियांकाच्या कोटी रुपयांच्या नेकलेसची चर्चा रंगली होती. आता तिच्या टॅटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसून स्टाइल केल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोसाठी पोझ देताना प्रियांकाने तिच्या हातावरील टॅटूही फ्लाँट केला आहे. प्रियांकाच्या हातावरील हा टॅटू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. प्रियांकाने हातावरील टॅटूमध्ये "Daddy's Lil Girl"  म्हणजेच वडिलांची छोटी मुलगी असं लिहिलं आहे. तिच्या या टॅटूची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

सध्या प्रियांका पती निक जोनससह युएसएला असते. प्रियांकाने अमेरिकन गायक आणि अभिनेता असलेल्या निक जोनसशी २०१८मध्ये लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर ४ वर्षांनी सरोगसीच्या मदतीने ते आईबाबा झाले. प्रियांका आणि निकने लाडक्या लेकीचं नाव मालती असं ठेवलं आहे.  

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटी