Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बॉलिवूड स्टार नाही तर एका अमेरिकन व्यक्तिच्या प्रेमात पडली होती प्रियांका चोप्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:07 IST

करिअरच्या यशोशिखरावर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण प्रियांकाबद्दलचे दोन प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत. एक म्हणजे, ...

करिअरच्या यशोशिखरावर असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण प्रियांकाबद्दलचे दोन प्रश्न चाहत्यांना सतावत आहेत. एक म्हणजे, प्रियांका बॉलिवूडमध्ये कधी येणार आणि दुसरा म्हणजे, प्रियांका लग्न कधी करणार? आता लग्न करण्याआधी आयुष्यात कुणीतरी असायलाही हवेच. खरे तर अक्षय कुमारपासून शाहरूख खानपर्यंत अनेकांशी प्रियांकाचे नाव जोडले गेले. अर्थात यापैकी कुणाहीसोबत प्रियांकाचे कमिटेड रिलेशनशिप राहिलेल्याचे समोर आले नाही. पण एका व्यक्तिसोबत मात्र प्रियांका सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. होय,खुद्द प्रियांकाने याचा खुलासा केला आहे.होय, अलीकडे एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका तिच्या लव्हलाईफबद्दल बोलली. सध्या मी सिंगल आहे. पण याआधी मी एका सीरिअस रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षभरापूर्वी आमचे ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून मी सिंगल आहे, असे प्रियांका म्हणाली. ही व्यक्ती कोण? हे तिने सांगितले नाही. पण प्रियांकाच्या आयुष्यात असलेली ती व्यक्ती अमेरिकन होती, असे संकेत मात्र तिने दिले. ती व्यक्ती ‘क्वांटिको’शी संबंधित नव्हती. कारण ‘क्वांटिको’चे सर्व मेल को-स्टार विवाहित आहेत, असे तिने सांगितले. हे रिलेशनशिप भारतात नाही तर अमेरिकेत होते, असे ती म्हणाली. मला आयुष्यात अनेक व्यक्ति भेटल्यात. पण अद्याप असा कुणीही सापडला नाही, ज्याच्यासोबत मी माझे सगळे आयुष्य घालवू शकेल. मला अद्यापही त्याचा शोध आहे. ज्याला पाहताक्षणी हाच तो, असे मला वाटेल, असेही प्रियांकाने सांगितले.ALSO READ : OMG!! हॉलिवूडमध्ये ‘बेस्ट’ नाही तर ‘वर्स्ट’च्या फे-यात फसली प्रियांका चोप्रा?एकंदर सांगायचे तर प्रियांका कधीच सीरिअस रिलेशनशिपमध्ये नव्हती, असे म्हणायला आता जागा उरलेली नाही. कारण प्रियांकाच्या आयुष्यात कुणी तरी होते. अर्थात आता प्रियांका सिंगल आहे. त्यामुळे पीसीला लवकरात लवकर कुणीतरी आपला भेटावा, हीच कामना करूयात.सध्या प्रियाकां ‘क्वांटिको3’मध्ये बिझी आहे. याशिवाय तिचे काही हॉलिवूड सिनेमेही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.