Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मालती जन्माला आल्यावर पुढचे १०० दिवस..."; प्रियंका चोप्राने लेकीविषयी व्यक्त केल्या भावुक भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:31 IST

जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका आणि तिचा पती निक जोनास यांची मुलगी मालती मेरी हिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियंका आणि तिचा पती निक जोनास यांची मुलगी मालती मेरी हिचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे, मात्र हा प्रवास प्रियांकासाठी अजिबात सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियंकाने मालतीच्या जन्मानंतरच्या कठीण काळाबद्दल आणि आपल्या मनातील भीतीबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.

प्रियंका आपल्या मुलीला 'मिरॅकल बेबी' म्हणते, कारण मालतीचा जन्म वेळेआधीच (Pre-mature) झाला होता. या काळाबद्दल बोलताना प्रियंका म्हणाली की, जन्मानंतर मालतीला पुढचे तब्बल १०० दिवस एनआयसीयूमध्ये (NICU) ठेवण्यात आले होते. जेव्हा मालती जन्माला आली तेव्हा तिच्यासाठी सर्व जग थांबल्यासारखे झाले होते आणि तिने तिच्या गरोदरपणाच्या काळात खूप कठीण दिवस पाहिले आहेत.

एक आई म्हणून आजही प्रियंकाच्या मनात भीती कायम आहे. तिने मान्य केले की, जेव्हा मालती तिच्यासोबत नसते, ती शाळेत असते किंवा प्रियंका कामासाठी दुसऱ्या देशात असते, तेव्हा तिला प्रचंड धाकधूक होत असते. ही भावना बहुधा प्रत्येक 'NICU मॉम'ची असते, असेही तिने नमूद केले. मालतीच्या आगमनानंतर प्रियंकाच्या आयुष्यातील सर्व प्राधान्यक्रम बदलले असून तिचे जग आता पूर्णपणे तिच्या मुलीभोवती फिरते.

या मुलाखतीत प्रियंकाने सरोगसीचा मार्ग का निवडला, यावरही भाष्य केले आहे. २०२३ मध्ये 'वोग'ला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत तिने स्पष्ट केले की, तिला काही गंभीर वैद्यकीय समस्या (Medical Conditions) होत्या, ज्यामुळे हा निर्णय घेणे तिच्यासाठी आवश्यक होते. प्रियंकाने तिच्या सरोगेट मातेबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती म्हणाली की, त्यांची सरोगेट खूप प्रेमळ आणि दयाळू होती, जिने सहा महिने मालतीची काळजी घेऊन तिला आपल्या गर्भात वाढवले. जरी या निर्णयावरून प्रियंकाला ट्रोल करण्यात आले असले, तरी आपल्या मुलीला सुरक्षितपणे जगात आणण्यासाठी हा एक आवश्यक मार्ग होता, असं प्रियंकाने ठामपणे सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra's emotional revelation: Malti's first 100 days were tough.

Web Summary : Priyanka Chopra revealed her daughter Malti's premature birth led to 100 days in NICU. She calls Malti a miracle baby. Citing medical reasons, Priyanka chose surrogacy. She expressed gratitude towards the surrogate mother, emphasizing Malti's well-being guided her decision.
टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूडप्रेग्नंसीगर्भवती महिलानिक जोनास