Join us
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Chopra Nick Jonas Wedding: लग्नाची जोरदार तयारी,या सेलिब्रिटींना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 19:19 IST

निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले आहे.घरी तुझं स्वागत आहे बेबी असं सुंदर आणि रोमँटिक कॅप्शन पिग्गी चॉप्सनं दिलं आहे.

ठळक मुद्दे२ डिसेंबरला प्रियंका आणि निकचं शुभमंगल जोधपूरच्या उमेद भवन येथे पार पडणारलग्नात आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांची यादीसुद्धा आली समोर निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले

ट्रेंडिंग कपल प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नासाठी आता काही दिवस राहिले आहेत. २९ नोव्हेंरपासून या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात होईल. २ डिसेंबरला प्रियंका आणि निकचं शुभमंगल जोधपूरच्या उमेद भवन येथे पार पडणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रियंका चोप्राच्या लग्नाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार २९ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला कॉकटेल पार्टी, १ डिसेंबरला हळद समारंभ आणि २ डिसेंबरला प्रियंका-निकचं शुभमंगल पार पडणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. याशिवाय या लग्नात आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांची यादीसुद्धा समोर आली आहे. 

यांत सलमान खान,रणवीर कपूर,आलिया भट, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, सिद्धार्थ रॉय कपूर अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे. या दोघांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना आपल्या लग्नाचं निमंत्रण पाठवल्याचं अनेक वृत्तांमधून समोर आले आहे. प्रियंका-निकच्या लग्नात दीड ते दोन हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रियंका आणि निकचं लग्न दोन पद्धतीने पार पडणार आहे. २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी  पार पडणार आहे. या लग्न सोहळ्याची जोधपूरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले आहे. 

घरी तुझं स्वागत आहे बेबी असं सुंदर आणि रोमँटिक कॅप्शन पिग्गी चॉप्सनं दिलं आहे. २५-२६ नोव्हेंबरला प्रियंका तिच्या स्काय इ पिंक या सिनेमाचं शुटिंग पूर्ण करेल. २७ तारखेला ती एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.  त्यानंतर २८ नोव्हेंबरला ती जोधपूरला रवाना होईल जिथे लग्नाच्या विधी सुरू होतील. सध्या कपलच्या संगीत सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. निक जोनास संगीत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय आणि बॉलीवुडच्या गाण्यावर थिरकणार आहे. 'गल्ला गुडिया' आणि 'पिंगा' या गाण्यावर तो थिरकणार आहे. प्रियंका आणि निक एकत्र खास परफॉर्मन्स देणार आहेत. 

 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनास