Join us

निक जोनाससोबत हनीमूनसाठी रवाना झाली प्रियांका चोप्रा, इन्स्टाग्रामवर शेअऱ केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 18:58 IST

जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रॉयल वेडिंग केली आहे. यानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील दिली आहे. लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील रिसेप्शन ठेवणार आहे.

ठळक मुद्देन्यू मॅरिड कपल हनीमूनसाठी रवाना झाले आहेतप्रियांका निकसोबतचा एका फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे

जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रॉयल वेडिंग केली आहे. यानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील दिली आहे. लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील रिसेप्शन ठेवणार आहे. मात्र याआधी दोघे हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.  

प्रियांका-निक आपल्या रिसेप्शननंतर ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेरिमनीमध्ये सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार न्यू मॅरिड कपल हनीमूनसाठी रवाना झाले आहेत.  

 

प्रियांका निकसोबतचा एका फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. निक सेल्फी घेताना दिसतोय. प्रियांकाच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच आपल्या 'द स्काय इज पिंक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते. प्रियांकाचा हा सिनेमा मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. सिनेमाचे कथानक यावर आधारित असेल. खरे तर  सुमारे वर्षभरापूर्वी या सिनेमाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या सिनेमासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती. त्यानंतर प्रियांकाने हा सिनेमा सोडल्याचीही बातमी आली होती.  

 १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाह केला. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास