Join us

अरे देवा! प्रियंका चोप्राला हवी इतकी मुलं, आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 13:13 IST

लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. पती निक जोनासबरोबरच्या तिच्या नात्याबद्दलही ती बर्‍याचदा बोलताना दिसते. प्रियंका चोप्राने एका मुलाखती दरम्यान 11 मुलांची आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणते की, तिला क्रिकेट टीम बनवायची आहे.

मुलाखतीत दरम्यान तिला किती मुलं हवी आहेत याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका चोप्रा म्हणाली, की तिला 11 मुलं हवी आहेत आणि ती मोठ्याने हसवू लागली आहे. ती म्हणाली, खरं तर तिला क्रिकेटची टीम बनवायची आहे, ज्यात 11 मुलं असतील. 

11 मुलांची इच्छा व्यक्त केल्यावर म्हणाली, कदाचित 11 खूप जास्त असतील. याबद्दल मला खात्री नाही.  11 मुलं हवी असं प्रियंका अर्थात मस्करीत म्हणाली होती. यामुलाखती दरम्यान प्रियंका तिच्या आणि निकच्या नात्याबाबत अनेक खुलासे देखील केले. 

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द व्हाइट टाइगर आणि वी कॅन बी हिरोजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. यात प्रियंका, राजकुमार रावए आदर्श गौरव एकत्र दिसणार आहेत. ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रा