Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘टॉक शो’मध्ये ढसाढसा रडली प्रियंका चोप्रा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 10:59 IST

शोदरम्यान प्रियंकाने मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण हे काय? अचानक प्रियंका रडू लागली.

ठळक मुद्देप्रियंकाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे.

गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियंका चोप्राचे बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक झाले. तिचा ‘स्काय इज पिंक’ हा बॉलिवूड सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या पसंतीतही उतरला. या चित्रपटाचे प्रमोशन करताना प्रियंकाने कुठलीही कसर सोडली नाही. अगदी भारतातच नाही तर परदेशातही तिने या चित्रपटाचे प्रमोशन केले. जिमी फेलनचा लोकप्रिय शो ‘द टुनाइट शो विद जिमी फेलन’ या अमेरिकन टॉक शोमध्येही तिने या सिनेमाचे प्रमोशन  केले. या शोदरम्यान तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण हे काय? प्रमोशन करताना अचानक प्रियंका रडू लागली. पण घाबरू नका.

त्याचे झाले असे की, या शोमध्ये ‘ईटिंग स्पाइसी विंग्स विद शॉन एवन्स’चा होस्ट शॉन एवन्ससोबत  एक सेगमेंट ठेवले होते.  या सेगमेंटमध्ये प्रियंका आणि जिमी यांना एक टास्क देण्यात आला होता. त्यानुसार प्रचंड तिखट चिकन विंग खाताना प्रियंका आणि जिमीला गप्पा मारायच्या होत्या. प्रियंकाने पहिला विंग तर आरामात संपवला. दुसरा तिला काहीसा तिखट लागला. पण तिसरा चिकन विंग खाताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी आले. तरीही तिने टास्क पूर्ण करण्याच्या इराद्याने चौथा विंग हातात घेतला पण तो खाताना प्रियांका अक्षरश: रडू लागली आणि इतकी की, ती गप्पा विसरली. याच क्षणाचा प्रियंकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियंकाच्या सिनेमाबद्दल बोलायचं तर ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा सत्य कथेवर आधारित आहे. मोटीव्हेशनल स्पीकर आयशा चौधरी आणि तिच्या आई-वडीलांच्या संघर्षाची ही कथा दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे. आयशाला पल्मोनरी फाइब्रोसिस नावाचा आजार असतो. तिचा वयाच्या 18 व्या वर्षी मृत्यू झाला होता. भारतात हा सिनेमा रिलीज होण्याआधी टोरंटो फिल्म फेस्टिवल 2019 मध्ये याचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.

टॅग्स :प्रियंका चोप्रास्काय इज पिंक