Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रियांका माझ्या भूमिकेला न्याय देऊ शकेल, आशा भोसलेंनी व्यक्त केली भावना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 13:21 IST

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित ‘टाईमलेस आशा कॉन्सर्ट’ या कार्यक्रमात ...

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित ‘टाईमलेस आशा कॉन्सर्ट’ या कार्यक्रमात त्यांना, ‘तुमचा जीवनक्रम पडद्यावर आणण्यासाठी कोण योग्य आहे, असे तुम्हाला वाटते?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आशा भोसले म्हणाल्या, मला वाटते प्रियांका चोप्रा. कारण ती सुद्धा एक गायिका आहे. त्यामुळे ती एका गायिकेला चांगले समजू शकते.  आशा भोसले यांचे पती आर.डी.बर्मन यांच्या संगीताला नव संजिवनी देण्यासाठी त्यांच्या आयुष्यावरही सिनेमा बनावा अशीही इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर बोलताना त्या म्हणाल्या, हो. त्यांच्यावरचा सिनेमाही बनला पाहिजे. त्यामुळे लोकांना त्यांची गाणी पुन्हा ऐकायला मिळतील. त्यांची जी गाणी काही कारणांमुळे प्रदर्शित झाली नाहीत, त्यांनाही पुन्हा आणले जाईल. त्यांच्या विस्मरणात गेलेल्या गाण्यांसाठी या बायोपिकमुळे पुन्हा उजाळा मिळेल.   आशा भोसले यांनी त्यांचे चरित्र लिहून पूर्ण केले आहे आणि लवकरच त्या आपल्या चाहत्यांना वाचण्यासाठी आपले आत्मचरित्र प्रकाशित करणार आहेत.