Join us

प्रियामणी-मुस्तफा राजचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:39 IST

रा-वन, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील अभिनेत्री प्रियामणीचा साखरपुडा बॉयफ्रेंड मुस्तफा राज याच्यासोबत बंगळुरु येथे खासगी समारंभात पार पडला. यावेळी ...

रा-वन, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील अभिनेत्री प्रियामणीचा साखरपुडा बॉयफ्रेंड मुस्तफा राज याच्यासोबत बंगळुरु येथे खासगी समारंभात पार पडला. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते. ३१ वर्षीय प्रियामणीने भावी वरासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. मुस्तफा राजसोबत आपला साखरपुडा झाल्याचेही तिने ट्विट केले आहे. २०१० साली प्रियामणीसोबत काम केलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीने या दोघांना इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियामणीने कन्नड, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटात भूमिका केल्या आहेत.