Join us

​प्रियदर्शिनी चॅटर्जी ‘मिस इंडिया २०१६’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 15:57 IST

गुवाहाटीची प्रियदर्शनी चॅटर्जी हा कालपरवापर्यंत अपरिचित असलेला चेहरा आता एकदम प्रकाशझोतात आला आहे. ‘एफबीबी मिस इंडिया २०१६’चा मुकूट पटकावत ...

गुवाहाटीची प्रियदर्शनी चॅटर्जी हा कालपरवापर्यंत अपरिचित असलेला चेहरा आता एकदम प्रकाशझोतात आला आहे. ‘एफबीबी मिस इंडिया २०१६’चा मुकूट पटकावत प्रियदर्शिनी ‘मिस इंडिया २०१६’ ठरली. शनिवारी अंधेरितील यशराज स्टुडिओत ‘फेमिना मिस इंडिया’च्या अंतिम फेरीचा दिमाखदार सोहळा रंगला. ‘मिस इंडिया’ हा किताब पटकावल्यानंतर प्रियदर्शिनी ‘मिस वर्ल्ड २०१६’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत बेंगळुरूची सुश्रूती कृष्णा सेकंड रनरअप तर लखनौची पंखुडी गिडवाणी थर्ड रनरअप ठरली. बॉलिवूडच्या दिग्गज कलावंतालह या सोहळ्याला हजेरी लावली.