Join us

​ प्रिया प्रकाश वारियरला कंपन्यांची लाखोंची आॅफर्स! एक पोस्ट शेअर करायचे मिळणार इतके लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 14:09 IST

एका रात्रीत इंटरनेट सेन्शेसन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकार वारियर हिच्यावर सध्या पैशांचा पाऊस पडतो आहे. होय, प्रियाची सोशल ...

एका रात्रीत इंटरनेट सेन्शेसन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकार वारियर हिच्यावर सध्या पैशांचा पाऊस पडतो आहे. होय, प्रियाची सोशल मीडियावरची वाढती लोकप्रीयता ‘कॅश’ करण्यासाठी अनेक कंपन्या उत्सूक आहेत. याच उत्सुकतेपोटी अनेक कंपन्यांनी प्रियाला मोठ्या आॅफर दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर आपल्या कंपनीचे प्रमोशन करायचे आणि त्यामोबदल्यात मोठी रक्कम घ्यायची, अशी ही आॅफर आहे . एका पोस्टसाठी प्रियाला लाखो रूपये देण्यास या कंपन्या तयार आहेत. ताज्या बातम्यांनुसार, प्रियाला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्याच्या मोबदल्यात ८ लाख रूपये देण्यास कंपन्या राजी आहेत. सध्या इन्टाग्रामवर प्रियाचे ५१ लाख फॉलोअर्स आहेत. प्रियाच्या याच ‘फॅन बेस’वर कंपन्यांची नजर आहे आणि यासाठी कंपन्या प्रियाला मागेल ती रक्कम देण्यास तयार आहेत.ALSO READ : आॅनस्क्रीन बॉयफ्रेंडसोबत होळीच्या रंगात रंगली प्रिया प्रकाश; व्हिडीओ व्हायरल!‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती.   प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या    चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे. हा प्रियाचा डेब्यू सिनेमा आहे. इंटरनेटवर लोकप्रीय झाल्यावर प्रियाकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स येत आहे. ती बॉलिवूड डेब्यू करणार, अशीही चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.