Join us

​प्रदर्शनापूर्वीच हृतिकच्या मोहेंजो दारोने वसूल केले ६० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:47 IST

१२ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या हृतिकच्या मोहेंजो दारोने प्रदर्शनापूर्वीच ६० कोटी वसून केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे सॅटेलाईट आणि ...

१२ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या हृतिकच्या मोहेंजो दारोने प्रदर्शनापूर्वीच ६० कोटी वसून केल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाचे सॅटेलाईट आणि म्युझिक राइट्स ६० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार नुकतेच ही डील झाली आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटाला टीव्हीवर देखील प्रेक्षक बघणे पसंत करतील. म्हणूनच चित्रपटाला एवढे पैसे मिळाले आहे. 'मोहेंजो दारो'मध्ये एआर रहमानचे संगीत आहे म्हणून म्युझिक राइट्सपण उंच किमतीत विकण्यात आले आहे.चित्रपटाचे निर्दशन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे.