Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बॉलिवूड डेब्यूपूर्वीच सैफची लेक सारा अली खान दाखवू लागली तोरा! सात चित्रपटांना दिला नकार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 11:46 IST

सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार आहे, हे ...

सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. अर्थात ‘केदारनाथ’ रिलीज व्हायला अद्याप बराच वेळ आहे. पण त्याआधीच सारा अली खान म्हणे ‘महाग’ झालीय. होय, साराचे भाव वाढल्याचे दिसू लागले आहे. खरे सांगायचे तर, इंडस्ट्रीतील अनेक दिग्दर्शक तिला साईन करायला उत्सूक आहेत. मात्र साराचे  आपले भलतेच काही सुरू असलेले दिसतेय. होय,  एकापाठोपाठ एक चित्रपटाच्या आॅफर्स सारा लाथाडत चाललीयं. चर्चा खरी मानाल तर आत्तापर्यंत सात चित्रपटांच्या स्क्रिप्टला साराने नकार दिला आहे.  या सर्व स्क्रिप्ट साराची आई अमृताला आवडल्या होत्या. पण साराने मात्र त्यांना नकार कळवला. अलीकडे सारा करण जोहर व आशुतोष गोवारीकरला भेटताना दिसली होती. अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन कंपनीनेही सारासोबत एका चित्रपटासाठी संपर्क केला होता. पण साराने या सर्वांना नकार दिला. या नकारामागचे कारण काय तर साराला म्हणे केवळ बड्या स्टार्ससोबतच काम करायचे आहे. करेल तर बड्या स्टार्ससोबतच काम करेल, नाहीतर घरी बसेल, असे काहीसे साराचे अ‍ॅटीट्यूड असल्याचे समजतेय. त्यामुळे स्क्रिप्ट चांगल्या असूनही मी केवळ ‘हिट अ‍ॅक्टर्स’सोबतच काम करेल, असे साराने सर्व निर्मात्यांना सांगून टाकले. सारा आलिया भट्टच्या मार्गावर चालून बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण करू इच्छिते, असेही म्हटले जातेय.साराचा ‘केदारनाथ’ या वर्षाच्या अखेरिस रिलीज होणार आहे. या करारानुसार, हा चित्रपट रिलीज झाल्याशिवाय सारा दुसरा कुठलाही चित्रपट साईन करू शकत नाही.ALSO READ : ​‘केदारनाथ’च्या टीममध्ये धुसफूस! सारा अली खानच्या चिंतेत भर!!‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये  केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे याचे कथानक आहे.