Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये विशेष अतिथी असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी; पत्नी अनुष्कासोबत विराटने दिले निमंत्रण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 22:05 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्यांनी इटली येथे थाटामाटात विवाह केल्यानंतर २१ डिसेंबर ...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्यांनी इटली येथे थाटामाटात विवाह केल्यानंतर २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथे या दाम्पत्याच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. या रिसेप्शनमध्ये मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहण्याची शक्यता आहे. नुकताच विराट कोहली पत्नी अनुष्का आणि भाऊ विकास कोहलीसोबत पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी गेला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत निमंत्रण स्वीकारले. यावेळी बराच वेळ त्यांनी या नवदाम्पत्याशी चर्चाही केली. दरम्यान, विराट आणि अनुष्काने गेल्या ११ डिसेंबर रोजी इटली येथे थाटामाटात लग्न केले. अतिशय शाही पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित होते. अनुष्का आणि विराटच्या कुटुंबीयांसह त्यांचे काही मित्र या सोहळ्याला उपस्थित होते. लग्नानंतर हे दाम्पत्य दिल्ली आणि मुंबई येथे ग्रॅण्ड रिसेप्शन देणार असून, त्यासाठी बॉलिवूडसह क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. सध्या विरुष्का आपल्या मित्रपरिवाराला निमंत्रण पत्रिका देण्याचे काम करीत आहे. दरम्यान, हे दोघे नुकतेच भारतात परतले आहेत. भारतात परताच अनुष्काने आपले सासर गाठत संसाराला सुरुवात केली आहे. तर विराट सध्या रिसेप्शनच्या तयारीला लागला आहे. दोघेही दिल्ली, मुंबईमधील रिसेप्शन पार पडल्यानंतर आपल्या कामात व्यस्त होणार आहेत.