तयारी सुरू....बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्स घेणार एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:47 IST
सैफ अली खानसाठी हे वर्ष रोमांचक असणार आहे. कारण या वर्षात काही रोमांचक अनुभव सैफच्या वाट्याला येणार आहेत. होय, ...
तयारी सुरू....बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्स घेणार एन्ट्री!!
सैफ अली खानसाठी हे वर्ष रोमांचक असणार आहे. कारण या वर्षात काही रोमांचक अनुभव सैफच्या वाट्याला येणार आहेत. होय, सर्वप्रथम सैफचा ‘कालाकांडी’ हा रिलीज होणार आहे. यानंतर याच वर्षात सैफची मुलगी सारा अली खान बॉलिवूड डेब्यू करतेय. साराचा पहिला वहिला सिनेमा ‘केदारनाथ’ या नव्या वर्षात रिलीज होणार आहे. त्यामुळे सैफ कमालीचा उत्सूक आहे. इतके कमी की काय, म्हणून या नव्या वर्षातच सैफचा मुलगा इब्राहिम खान हा सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची बातमी आहे. साहजिकच मुलीपाठोपाठ मुलगाही बॉलिवूड डेब्यू करणार म्हटल्यावर सैफ किती एक्ससाईटेड असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. खुद्द सैफने ताज्या मुलाखतीत याबाबतचे संकेत दिले आहेत. केवळ इब्राहिमचं नाही तर अक्षय कुमारचा मुलगा आरव याच्या बॉलिवूड डेब्यूबद्दलही सैफने खुलासा केला आहे. ALSO READ : अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाही करतोय डेब्यू...पण बॉलिवूडमध्ये नाही तर...!इब्राहिम, आरव आणि त्यांच्या ग्रूपचे सगळेच सिक्स पॅक्स अॅब्ज बनवून बॉलिवूड स्टार बनू इच्छितात. त्यांना अॅक्टर नाही तर स्टार बनायचे आहे. माझ्यासाठी हे काहीसे चिंताजनक आहे. कारण सगळ्यांना स्टार बनणे शक्य नाही, असे सैफ म्हणाला. आता इब्राहिम व आरव भविष्यात स्टार बनतात की अॅक्टर हे सर्वस्वी त्यांच्या टॅलेंटवर अवलंबून असणार आहे. पण दोघेही आज ना उद्या बॉलिवूडमध्ये येणार, हे मात्र नक्की आहे. सैफने तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता केवळ इब्राहिम व आरव स्वतंत्र डेब्यू करतात की त्यांच्या पापाच्या एखाद्या रिमेकमधून एकत्र एन्ट्री घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. अक्षय कुमार व सैफ अली खान या दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. या दोघांचा ‘मैं खिलाडी तू अनाडी’ सुपरहिट झाला होता. याच सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये इब्राहिम व आरव दिसणार, अशी आशा करण्यास त्यामुळेच हरकत नाही. होय ना?