Prem Chopra Hospitalized :बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असताना, आता बॉलिवूडच्या आणखी एका ज्येष्ठ अभिनेत्याची प्रकृती खालावली आहे. दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९२ वर्षीय प्रेम चोप्रा यांना हृदयाशी संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांच्या शरीरात संसर्ग पसरल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
वृत्तानुसार, प्रेम चोप्रा यांच्यावर सध्या डॉ. नितीन गोखले आणि डॉ. जलील पार्कर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील उपचारांसाठी त्यांना पुढील दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु, वैद्यकीय पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
इंडिया टुडेशी बोलताना, प्रेम चोप्रा यांचे जावई विकास भल्ला यांनी सांगितले की, त्यांचे सासरे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. या संदर्भात माहिती देताना विकास भल्ला पुढे म्हणाले की, "या सर्व वयाशी संबंधित गुंतागुंती आहेत आणि एक नियमित चेकअप आहे. यात काळजी करण्यासारखे काहीही नाही." हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक, प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Web Summary : Veteran Bollywood actor Prem Chopra, 92, was admitted to Lilavati Hospital due to a health scare involving a spreading infection. He's under the care of doctors and is expected to remain hospitalized for a few days. His condition is currently stable, according to his son-in-law, it's age-related and a routine checkup.
Web Summary : दिग्गज बॉलीवुड अभिनेता प्रेम चोपड़ा, 92 वर्ष, संक्रमण फैलने के कारण लीलावती अस्पताल में भर्ती। डॉक्टरों की देखरेख में हैं और कुछ दिनों तक अस्पताल में रहने की उम्मीद है। उनके दामाद के अनुसार उनकी हालत स्थिर है, यह उम्र से संबंधित है और एक नियमित जांच है।