Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं, सेवा केली; 'डिंपल गर्ल'चा साधेपणा, प्रीती झिंटाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:55 IST

प्रीती पिवळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार सूटमध्ये सुवर्ण मंदिरात पोहचली होती.

आयपीएलचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रत्येक सामन्यासोबत संघमालकांच्या हृदयाची धडधड वाढत आहे. अशा तणावाच्या वातावरणात पंजाब किंग्सची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आध्यात्मिक शांतीचा मार्ग निवडला आहे. शनिवारी पहाटे प्रीतीने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि आपल्या संघाच्या विजयासाठी साकडं घातलं. यावेळी ती कोणत्याही व्हीआयपीप्रमाणे नव्हे, तर सामान्य भाविकाप्रमाणे दर्शनासाठी आली होती.

पिवळ्या रंगाच्या पारंपरिक सलवार सूटमध्ये सुवर्ण मंदिरात प्रीती पोहचली होती. तिने केवळ दर्शनच घेतले नाही, तर एक सामान्य भक्त म्हणून लंगर हॉलमध्ये सेवाही केली. दर्शनानंतर प्रीतीने स्वतःच्या हाताने भाविकांना लंगर वाढला. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

माध्यमांशी बोलताना प्रीती म्हणाली, "वाहेगुरूंचं बोलावणं आलं म्हणून मी येथे आले". पुढे संघाच्या कामगिरीवर बोलताना तिने कबूल केले की, स्पर्धेच्या या टप्प्यावर कठोर परिश्रमासोबतच देवाच्या आशीर्वादाचीही नितांत गरज आहे. 

प्रीतीच्या संघाची आयपीएल २०२६ मधील कामगिरी

आयपीएल २०२६ मध्ये तिचा संघ पंजाब किंग्स उत्कृष्ट कामगिरी करत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने सुरुवातीचे सामने जिंकून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवले आहे, ज्याबद्दल प्रीती खूप आनंदी आहे. 

प्रीतीचं बॉलिवूड कमबॅक

प्रीती झिंटाच्या बॉलिवूडमधील कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 'लाहोर १९४७' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सनी देओलसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय.  या सिनेमाची कथा असगर वजाहत यांच्या 'Jis Lahore Nai Dekhya O Jamyai Nai'  या नाटकावर आधारित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Preity Zinta's Simplicity: Golden Temple Visit and Service Appreciated

Web Summary : Amidst IPL tension, Preity Zinta visited the Golden Temple, praying for her team's victory. She served food in the Langar hall like a common devotee. Her simplicity is being praised. She will be seen in 'Lahore 1947' with Sunny Deol.
टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडपंजाब किंग्स