Join us

पती जीन गुडइनफ नाही तर कोण आहे प्रीती झिंटाचं पहिलं प्रेम, स्वत: दिली कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:51 IST

प्रीतीनं पहिल्या प्रेमाबद्दल एका चाहत्यांशी बोलताना खुलासा केलाय.  

प्रीती झिंटानं Preitt Zinta) आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'कल हो ना हो', 'सोल्जर', 'हिरो', 'दिल से' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.  मात्र काही वर्षांपूर्वी प्रीतीने सिनेमांमधून ब्रेक घेतला आणि बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केलं. नंतर सरोगसीद्वारे तिला जुळी मुलंही झाली. त्यांचं नाव जय आणि जिया असं आहे. प्रीती सोशल मीडियावर जीन गुडइनफसोबतचे फोटो कायम शेअर करताना दिसून येते. दोघांचंही एकमेंकावर खूप प्रेम आहे. पण, पती जीन गुडइनफ हे प्रीती झिंटाचं पहिलं प्रेम नाही, असे आता समोर आलं आहे.  कारण, प्रीतीनं पहिल्या प्रेमाबद्दल एका चाहत्यांशी बोलताना खुलासा केलाय.  

प्रीती ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. तिच्या एक्स अकाऊंटद्वारे 'PZchat' हे सेशन घेते आणि त्याद्वारे चाहत्यांच्या प्रश्नाला ती उत्तर देत असते. नुकतंच तिनं हे सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याशी बोलताना तिनं तिचं पहिलं प्रेम एका कार अपघातामध्ये गमावल्याबद्दल सांगितलं. 

एका चाहत्यानं प्रीतीला प्रश्न केला की, "प्रीती झिंटा मॅडम जेव्हा मी 'कल हो ना हो' पाहतो, तेव्हा मी खूप रडतो. तुम्ही नैना कॅथरीन कपूरची भूमिका खूप सुंदर पद्धतीने साकारली.  तसेच प्रेम म्हणजे कधीकधी समोरच्या व्यक्तीला जाऊ देणं हे देखील शिकवलं. २० वर्षांच्या शूटिंगनंतर जेव्हा तुम्ही 'कल हो ना हो' पाहता, तेव्हा तुम्हीदेखील आमच्यासारखंच रडता का?". त्यावर उत्तर देताना प्रीतीने लिहिले की, "हो, मी देखील 'कल हो ना हो' पाहताना रडते. अगदी शूटिंग दरम्यान देखील मी खूप रडले होते, कारण माझं पहिलं प्रेम मी एका कार अपघातात गमावलं होतं".

पुढे ती म्हणाली, "हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. या सिनेमाची मजेदार गोष्ट म्हणजे, बहुतेक दृश्यांमध्ये सर्व कलाकार खरोखर रडले होते. जेव्हा अमनचा (शाहरुख खान) मृत्यू होतो, तेव्हा प्रत्येकजण कॅमेऱ्यासमोर आणि मागे देखील रडत होता".

'कल हो ना हो' हा निखिल अडवाणी दिग्दर्शित चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स अंतर्गत तयार करण्यात आला होता. या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या जबरदस्त अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. आजही या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळते.प्रीती झिंटाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून इंडस्ट्रीत कमब्रक करण्यास सज्ज झाली आहे. तसेच प्रीती ही आयपीएल सामन्यांमुळेही कायम चर्चेत असते.  ती जाब किंग्स इलेव्हन (Kings XI Punjab) या संघाची मालकिण आहे.

टॅग्स :प्रीती झिंटाअपघातबॉलिवूड