Join us  

प्रिती झिंटा कोर्टाचा दणका! कंपनीविरोधात चालणार दिवाणी खटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:48 PM

अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या केपीएच ड्रीम क्रिकेट प्राय़ लिमिटेड या कंपनीने दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली.  कोर्टाच्या या निकालानंतर प्रितीच्या कंपनीविरोधात दिवाणी खटला चालेल.

अभिनेत्री प्रिती झिंटा हिच्या केपीएच ड्रीम क्रिकेट प्राय़ लिमिटेड या कंपनीने दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेत कंपनीने तक्रारकर्ता डॉ़ सुभाष सतीजा यांनी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली होती. कोर्टाच्या या निकालानंतर प्रितीच्या कंपनीविरोधात दिवाणी खटला चालेल. प्रितीच्या केपीएस ड्रिम्स कंपनीने चंदीगडच्या सेक्टर १९ मध्ये डॉ़ सतीजा यांची सदनिका भाड्याने घेतली होती. डॉ़ सतीजा यांनी निवासी वापरासाठी आपली जागा भाड्याने दिली होती. पण कंपनीने याठिकाणी व्यावसायिक काम सुरु केले. यानंतर निवासी जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर केल्याचा ठपका ठेवून संबंधित विभागाने डॉ़ सतीजा यांना ३़८ लाख ११ हजारांचे नोटीस बजावले होते. कंपनीला या नोटीसबद्दल कळताच त्यांनी ही जागा रिकामी केली होती. यानंतर डॉ़ सतीजा यांनी कंपनीकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्यात यावा अशी मागणी कर प्रिती झिंटाच्या कंपनीने याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने कंपनीची ही याचिका गत मंगळवारी फेटाळून लावली. याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २३ जुलैला होणार आहे.

टॅग्स :प्रीती झिंटाबॉलिवूडन्यायालयकिंग्स इलेव्हन पंजाब