Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नेंट करीना कपूर हिमाचलला बाय-बाय करुन मुंबईला निघाली, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 18:38 IST

करिना कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करतेय.

करिना कपूर मुलगा तैमुरसोबत दिवाळीपासून हिमाचल प्रदेशात आहे. हिमाचलमध्ये सैफ अली खानच्या आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. करीना आणि तैमूर हिमाचल प्रदेशात सैफला भेटायला गेले होते. आता या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, त्यामुळे करीना मुंबईला रवाना झाली आहे.

करीना कपूरसोबत मलायका अरोरा देखील बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला भेटण्यासाठी धर्मशालाला गेली होती पण ती आधीच मुंबईत परतली आहे. करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर सेल्फी शेअर करत सांगितले आहे की, ती आता मुंबईत येणार आहे. तिने सेल्फी शेअर करताना लिहिले, "बाय बाय पालमपूर, एक सुखद अनुभव होता... आणि हॅलो मुंबई ... मी घरी येते आहे."

करिना कपूर प्रेग्नेंट आहे आणि पुढच्या वर्षी ती तिच्या दुसर्‍या बाळाला जन्म देणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलयाचे झाले तर, प्रेग्नेंसीमध्ये करीनाने तिचा आगामी सिनेमा 'लालसिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण केले आहे. ती पुन्हा एकदा आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट 'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रिमेक असून 2021 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :करिना कपूर